किरण सामंत यांच्या पाठपुराव्या मुळे स्वगृही जाणाऱ्या आंतरजिल्हा शिक्षकांच्या कामाला आले यश.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्ष पिढी घडवनाऱ्या आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदली संदर्भात अनेक दिवस प्रलंबित होता. या शिक्षकांनी काही महिन्यापूर्वी किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्या मांडल्या त्यावेळी या संदर्भात पाठपुरावा करून न्याय देण्याचा शब्द किरण सामंत यांनी आंतरजिल्हा शिक्षकांच्या शिस्त मंडळाला दिला. आणि दिलेला शब्द तंतोतंत पाळून पाठपुरावा करून आंतरजिल्हा शिक्षकांना स्वगृही परतण्यात मार्ग मोकळा करून दिला. बऱ्याच दिवसांपासून स्वगृही जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आंतरजिल्हा बदली शिक्षक बांधवांना कार्यमुक्त केल्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या बदलीत पहिला टप्पा सर्व महिला आणि संवर्ग 1 शिक्षक दुसरा टप्पा संवर्ग 2 आणि सर्वसाधारण शिक्षक असा करण्यात आल्या आहेत.आंतरजिल्हा शिक्षकांनी हा आनंद किरण सामंत यांना भेटून साजरा केला. यावेळी या शिक्षकांनी किरण सामंत यांचे आभार मानले.