एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई ठरली तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट शाळा.
रत्नागिरी: (जमीर खलफे)*१९६२ सालात कडवई मोहल्ल्यातील काही मुस्लिम बांधवांनी गावातील मुलांच्या भविष्यासाठी एक शाळा सुरू केली जिला महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई अस संबोधण्यात आल. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं व शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत नागरिक घडावे व त्यांना रोजगार मिळावा, या उद्दिष्टाने या संस्थेचे कामकाज सुरू होते व अद्यापही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या *”डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”* या अभियानांतर्गत राज्यभरामध्ये अत्याधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई या अल्पसंख्यांक उर्दू हायस्कूल ने सहभाग दर्शवला होता त्याच प्रमाणे या स्पर्धेमध्ये तालुक्यातून अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या परंतु या सर्व शाळांमधून *महाराष्ट्र उर्दू स्कूल कडवई गुणवत्तेच्या सर्व टप्प्यांवर यशस्वी ठरली व तालुक्यात प्रथम येऊन आता संपूर्ण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये करणार आहे.* शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले ग्रामीण भागामध्ये असताना देखील शाळेच्या वैशिष्टांबद्दल व गुणवत्तेबद्दल सर्वांनाच कौतुक वाटते आहे. *एज्युकेशन सोसायटी कडवई चे अध्यक्ष श्री सादिक काझी* यांच्या विचारातून मागच्या सहा वर्षांमध्ये शाळेने अनेक बाबींमध्ये प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील शाळा असताना देखील शैक्षणिक गुणवत्तेबरोबर जगाच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी कुठेच मागे पडणार नाहीत यासाठी अनेक उपक्रम विद्यालयामध्ये सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनामध्ये आवड वाढण्यासाठी; त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कलागुणसंपन्न बनविण्यासाठी; त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वोकेशनल ट्रेनिंग मिळावे याकरिता; विद्यार्थी आदर्श नागरिक बनावे पण त्याबरोबर ते स्मार्ट देखील बनावे याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभागी होताना स्पर्धेच्या सर्व निकषा मधल्या 80 टक्के गोष्टी या गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई मध्ये केल्या जात आहेत. अनेक अशाही गोष्टी त्यामध्ये आहेत ज्या स्पर्धेच्या गुणांकनामध्ये सामील नाही परंतु एक अत्याधुनिक शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य बनवत असताना लागणाऱ्या सर्व बाबी या विद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. शहरी शिक्षण आणि त्यातून निर्माण होणारे सुजाण नागरिक त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात याकरिता ते नेहमी कटिबद्ध असतात. त्याचबरोबर *एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष डॉक्टर अन्सार जुवळे* यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांना सामाजिक भान निर्माण व्हावे यासाठी डॉक्टर जुवळे नेहमी कटिबद्ध असतात; विद्यार्थी स्मार्ट बनत असताना त्यांची कुशलता वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते. शाळेच्या या यशामध्ये संस्थाचालकांचे मोलाचे योगदान आहे. यश प्राप्ती होताना प्रशालेचे *मुख्याध्यापक श्री रिजवान कारिगर* त्याच बरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांसाठी व शाळेच्या प्रगती साठी अहोरात्र मेहनत केली आहे; त्यामुळेच हे यश प्राप्त होताना शासनाने घोषित केलेल्या गुणवत्तेवर काम करणारे व समाजाला सुजाण नागरिक देणारे हे शिक्षक यांची प्रचंड मेहनत व कार्यक्षमता सर्वांना पाहावयास मिळते. एज्युकेशन सोसायटी कडवईच्या या विद्यालयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. हे कौतुक होत असताना पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना उत्कृष्टपणे पूर्ण करण्यामध्ये संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक *श्री प्रांजल मोहिते* यांचे मोलाचे योगदान लाभले; त्याचबरोबर *कडवई केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय दीपक यादव सर* यांचे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले. समाज – संस्था चालक व शिक्षक यांच्या अनेक वर्षाच्या मेहनतीमुळे व प्रगतिशील विचारसरणी मुळे हे यश प्राप्त झाले आहे . विद्यालयाच्या या यशाबद्दल तालुक्यातून अनेक प्रतिष्ठितांनी विद्यालयाचे कौतुक केले आहे व त्याचबरोबर जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वासाठी अनेक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.