राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार.

पश्‍चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगलपरिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य राहीलेले आहे. विविध कारणास्तव जखमी होणार्‍या या वन्यजीवांवर तात्काळ प्राथमिक उपचार करता यावेत यादृष्टीकोनातून राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे.राजापूरात उभारले जाणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र ठरणार आहे. सर्वसोयीसुविधांनीयुक्त या प्राथमिक उपचार केंद्रामुळे जखमी होणार्‍या प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांवर तात्काळ प्राथमिक उपचार होवून त्यांचा जंगलपरिसरातील नैसर्गिक अधिवासातील पुढील जीवनप्रवास अधिक सुखकर होणार आहे.वनविभागाच्या जागेमध्ये हे प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्यामध्ये शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील सुमारे 23 हेक्टर क्षेत्र विचाराधीन आहे. मात्र, अपेक्षित असलेली मुबलक वा विस्तीर्ण प्रमाणात जागा वनविभागाकडे उपलब्ध न झाल्यास महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वनविभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button