
कर्जाचे आमिष दाखवून एका महिलेची ५० हजाराची फसवणूक
विश्वास संपादन करत १० लाखाचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने दुसर्या एका महिलेची ५० हजाराची फसवणूक केल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या प्रकरणी त्या महिलेविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद रोहिणी रुपेश चव्हाण (५२, भोम) यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हा दाखल महिलेने रोहिणी चव्हाण यांना महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र स्किम अंतर्गत ८ दिवसात कर्ज काढून देते, असे सांगून चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. १० लाखाचे कर्ज काढण्यासाठी चव्हाण यांच्याकडून त्या महिलेने ५० हजार एवढी रक्कम घेतली. असे असताना मात्र चव्हाण यांना कोणतेही प्रकाराचे कर्ज त्या महिलेने मिळवून दिले नाही. तसेच घेतलेले ५० हजार रुपयेही परत न देता चव्हाण यांची फसवणूक केली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या फसवणूक करणार्या महिलेवर गुन्हा दाखल झाला.
www.konkantoday.com




