जिल्ह्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार, सुरूआगामी निवडणुकीत उदय सामंतांचा पराभव निश्चित-राजन साळवी
आगामी विधानसभा निवडणुकीवर डाेळा ठेवून हातात निधी नसतानाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खिरापतीसारखी शिफारस पत्रे वाटत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. तर दुसर्या बाजूला शासनाच्या विविध याेजना तळागाळात पाेहाेचवण्यासाठी आपण आमदार म्हणून ग्रामपंचायतिनिहाय बैठका घेण्याबाबत गटविकास अधिकाराना पत्र दिले. तर पालकमंत्र्यांच्या दबावापाेटी बैठका घेवू दिल्या जात नाहीत. एकंदरीत जिल्ह्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असून त्याला आता येथील जनता कंटाळली असून आगामी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांचा पराभव निश्चित असल्याचा टाेला राजन साळवी यांनी लगावला आहे.राजापूर येथे आयाेजित पत्रकार परिषदेत साळवी बाेलत हाेते. मुख्यमंत्री लाडकी बहिण याेजनेकरिता विधानसभा निहाय गठीत करण्यात आलेल्या समित्यांवर जिल्ह्यात केवळ महायुतीतील पक्षांच्याच आमदारांना सदस्य म्हणून घेण्यात आले. शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांना जाणुनबुजून डावलण्यात आल्याचा आराेप यावेळी त्यांनी केला. तर काेराेना काळापासून आमसभा न झाल्याने गावातील समस्या गावातच साेडविण्याच्या दृष्टीने आपण ग्रामपंचायत निहाय बैठका घेण्याबाबत संबंधित गटविकास अधिकार्याना पत्र दिले हाेते. मात्र कुणाच्यातरी दबावापाेटी बैठका घेवू दिल्या नसल्याचा आराेप साळवी यांनी केला. www.konkantoday.com