चिपळुणात गांधारेश्वर बाजूचे रेल्वे तिकिट घर लवकरच सुरू-शाैकत मुकादम.

चिपळूण रेल्वेस्थानकाबाहेर गांधारेश्वर मंदिराच्या बाजूला शहरासाठी बांधलेल्या मात्र गेल्या पंधरा वर्षापासून पडून असलेल्या रेल्वे तिकिट घरात महिनाभरात तिकिट खिडकी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन काेकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संताेष कुमार झा यांनी बुधवारी दिल्याची माहिती काेकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शाैकत मुकादम यांनी दिली. चिपळूण शहर व इतर परिसरातील रेल्वे प्रवाशांना बहाद्दूरशेखमार्गे किंवा \रशीतिठा मार्गे चिपळूण रेल्वे स्टेशनवर तिकिट बुकींगसाठी जावे लागत आहे. यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे.15 वर्षापूर्वी गांधारेश्वर-मुरादपूर भागाकडे काेकण रेल्वेने शहरातील प्रवाशांसाठी रेल्वे तिकिट घराची निर्मिती केली हाेती. त्या जागेत रेल्वेच्या ठेकेदार कंपनीचे कामगार रहात असल्याने मुकादम यांनी आवाज उठविला हाेता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button