
सोमेश्वर आलिमवाडी महापुरुष स्टॉप येथे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकासह चौघे जण जखमी.
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर आलिमवाडी महापुरुष स्टॉप येथे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकासह चौघे जण जखमी झाल़े. ही घटना मंगळवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आल़ी याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे रिक्षा चालविणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.सुनील देवजी पवार (54), सुनिती सुनील पवार (50), चिन्मय सुनील पवार (7, ऱा सर्व सामेश्वर रत्नागिरी) व रिक्षाचालक योगेश विलास घोसाळे (ऱा आंबेशेत रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश घोसाळे हा 3 सप्टेंबर रोजी आपल्या ताब्यातील रिक्षामध्ये सुनील पवार, सुनिती व चिन्मय या तिघांना घेवून सोमेश्वर येथे जात होत़ा. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा सोमेश्वर आलिमवाडी महापुरुष स्टॉप येथे आली असत़ा योगेश याचा रिक्षावरील ताबा सुटल़ा. यावेळी रिक्षा उतारात मागे जावून उलटल़ी.या अपघातात सुनील, सुनिती व चिन्मय तसेच रिक्षाचालक योगेश याला देखील दुखापत झाल़ी