सेवानिवृत्त विमा अधिकारी, आर एच पी फाउंडेशनतर्फे दिव्यांग संदेशला व्हीलचेअर ची मदत.

रत्नागिरी — कु.संदेश रविंद्र लांजेकर.मु.पो तुळसणी ता.संगमेश्वर जि.रत्नागीरी.वय २४ वर्ष सध्या रहायला गोडावुन स्टॉप रत्नागीरीमधे आहे.संदेशला जन्मत:च सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे.त्याच्या दोन्ही हातापायामधे ताकद कमी असल्याने तो कधीच चालु शकला नाही.घरचेच त्याला शाळेत नेवुन सोडायचे आणायचे.पाचवर्षाचा असताना केईएम हॉस्पीटल मुंबई येथे त्याच्या पायावर शस्रक्रीया झाली.पॅराप्लेजिक फाउंडेशन सायन येथे चारवर्ष राहुन फिजिओथेरपी घेतली पण फारसा फरक पडला नाही.४थी पर्यतचे शिक्षण गावी तुळसणीला झाले.त्यानंतर शासकिय अपंग संस्था मिरज येथे ५ वी ते १०वी पर्यतचे शिक्षण झाले.पुढील शिक्षणासाठी ते रत्नागीरीत आले.आंबेडकर भवन येथे राहुन गोगटे कॉलेजला १२ वी पर्यतचे शिक्षण व्हीलचेअरवरुन जावुन पुर्ण केले.सध्या घरीच असतो पुढील शिक्षण बंद केले आहे.कामासाठी प्रयत्न करतात पण यश येत नाही.व्हीलचेअर खराब झाल्याने बाहेर कुठेच जाता येत नाही. संदेश चार भावंडात सर्वात मोठा मुलगा आणी तीन बहीणी आहेत.एक धनश्री लांजेकर हिचे लग्न झाले आहे.मधली ऋतुजा लांजेकर दुकानात कामाला जाते तर छोटी मानसी लांजेकर १२ वित शिकते.वडील श्री राजेंद्र दत्ताराम लांजेकर मुंबईला प्रेसमधे काम करत होते पण आता घरीच असतात.आई सौ.रजनी राजेंद्र लांजेकर गृहीणी आहेत आणि बाहेर जावुन घरकाम करतात.सध्या आई आणी बहीण कमावतात त्यावरच त्यांचा कौटुंबिक खर्च चालतो. संदेशच्या पालकांनी आरएचपी फाउंडेशनला व्हीलचेअर संदर्भात संपर्क साधला.संस्थेचे अध्यक्ष श्री सादिक नाकाडें यांनी संदेशची सविस्तर माहीती घेतली.संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी सौ. मनाली विनायक खवळे यांनी दिव्यांगासाठी मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्या प्रमाणे समीर नाकाडे यांनी सौ.मालती खवळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी कु.संदेशला कन्फर्टेबल व्हीलचेअरची मदत केली.त्यामुळे लांजेकर कुटुंबीयांनी मालती खवळे व आर एच पी फाउंडेशन चे आभार मानले.व्हीलचेअर वाटप करताना सेवानिवृत्त अधिकारी सौ. मालती खवळे व त्यांचे पती श्री.विनायक खवळे,आर एच पी फाऊंडेशनचे संस्थापक श्री सादिक नाकाडे,सदस्य प्रिया बेर्डे तसेचड कु.संदेश लांजेकर आणि त्यांचे वडील श्री रवींद्र लांजेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button