
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी.
गणपतीसाठी चाकरमानी कोकणात रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे. आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक कोंडी दिसत आहे.त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यात रस्त्याची वाईट अवस्था असल्याने आणखी मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. पनवेल पासून महाडपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासात विघ्न येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत.