
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला मिळाला आज डिस्चार्ज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्णाला आज जिल्हा रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कोरोना रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मंगलोर एक्सप्रेसने प्रवास करून मुंबईतून जिल्ह्यात आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केले होते.14 दिवसांनी त्याचा स्वॅब घेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.त्यानंतर पुन्हा त्याचा स्वॅब घेण्यात आला. घेतलेले स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज गुरुवारी सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आदींसह रुग्णालयातील कोवीड-19 वॉर्डमधील कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com