रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार. माधव अंकलगे यांना जाहीर.
मागील अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत प्रशासनाकडून पुरस्कार जाहीररत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत सन्मानित करण्यात येते. यावर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा नुकतीच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे यांना जाहीर झाला आहे. मागील अनेक वर्षे सातत्याने माधव अंकलगे यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास आणि पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही शाळा ह्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त बनविल्या आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव करत शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यातून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतात. विविध स्पर्धा, वाचन – लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, ग्रामीण व शहरी भागातील प्रबोधन, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, विद्यार्थ्यांसोबतच स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, साक्षरता अभियानातील सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन, विविध स्पर्धामधील विद्यार्थी सहभाग, त्यांचे यश या सर्व बाबीचा विचार करून जिल्हास्तरीय निवड समितीने त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने देणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जाहीर केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची माहिती घेऊन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देत कौतुक केले आहे. परसबाग, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सप्ताह, यासह विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. यासह विविध विषयांवर त्यांनी लेखन करतानाच वेगवेगळ्या ठिकाणी करिअर मार्गदर्शन, पालक प्रबोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, विविध अभियाने, प्रशिक्षणे यामध्ये व्याख्याने दिली आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच माधव अंकलगे हे विविध क्षेत्रांत लक्षणीय कार्य करत असतात. सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांत त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी हा सन्मान केला आहे. माधव अंकलगे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.