![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/09/images-1-3.jpeg)
मोजणीसाठी भूमी अभिलेखला पैशांची प्रतीक्षा.
रत्नागिरी तालुक्यातील रीळ व उंडी गावांमध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांनी जमीन मोजणीचा प्रस्ताव तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवला. प्रस्तावित क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी पैसे भरणे आवश्यक आहे. अद्याप पैसे भरले नाहीत. ते हाती आल्यानंतर मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे भूमी अभिलेख विभागाचे उपविभागीय एन. एच. मोरे यांनी सांगितले.रीळ गावातील १३६ सातबार्यांवरील १५३ हेक्टर जमीन उंडी गावामध्ये ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. एकूण २१३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या ४ पट एवढ्या प्रमाणात मोबदला मिळेल. तथापि प्रस्तावित क्षेत्रातील सर्व जमिनीची मोजणी करण्यासाठी रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकार्यांनी प्रस्ताव रत्नागिरी तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवला आहे.www.konkantoday.com