
दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत-खासदार संजय राऊत
माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऑपरेशन टायगर आणि भाजपवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल. मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील.
दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.