बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा अध्यक्षपदी ऍड. संग्राम देसाई.
सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे सदस्य ऍड. संग्राम देसाई यांची प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बार कौन्सिलवर निवडून गेल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात दोनवेळा उपाध्यक्ष व आता अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होण्याची बार कौन्सिलच्या इतिहासातील दुर्मिळ घटना म्हणून याकडे पाहिले जाते. मुंबई उच्च न्यायालयातील बार कौन्सिलच्या सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.www.konkantoday.com