दापोलीच्या डंपिंग ग्राऊंडवर प्लास्टीकसह कचर्याचा ढीग.
स्वच्छ दापोली व सुंदर दापोली अशी ओळख असणार्या दापोलीच्या डंपिंग ग्राऊंडवर सर्वत्रच कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचाा ढीग पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवाय प्लास्टिक पिशव्या गुरे चारा समजून खात असल्याचेही समोर येत आहे.दापोली शहरात नगर पंचायतीकडून दररोज घंटागाड्या फिरून ओला, सुका कचरा संग्रहीत करण्यात येतो. जमा केलेला कचरा काळकाईकोंडजवळ असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. मात्र या कचर्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळे हा कचरा वार्याबरोबर सर्वत्र पसरला आहे. या कचर्यात अधिक प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसत असल्याचे नागरिकांमधून समोर आले आहे.www.konkantoday.com