जादा गाड्या सोडल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं.
गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकण रेल्वेमार्गावर काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत, तर नियमित धावणाऱ्या गाड्या दिड तास उशीराने धावत आहेत.कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणकन्या , तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस गाड्या उशीरानं धावत आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रेल्वेचा वेग मंदावलाय. याचा फटका मात्र चाकरमाण्यांना बसत आहे