चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील पैसे लांबविले.
चिपळूण शहर बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली असताना याच गर्दीचा फायदा उठवून एका बेकरीमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधील चोरट्यांनी पैसे लांबवल्याची घटना बुधवारी घडली. हा सर्व प्रकार बेकरीतील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. त्या आधारे पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी सकाळी चिपळूण बाजारपेठेतील एका बेकरीत ही महिला खरेदीसाठी आली होती. या महिलेच्या शेजारी २ व्यक्ती होत्या. महिलेने खरेदी केल्यानंतर बेकरी मालकाला पैसे देण्यासाठी खांद्यावरची पर्स उघडली. मात्र पर्समधील पैसे अचानक गायब झाल्याने ती घाबरली. तिने हा प्रकार बेकरी मालकाला सांगितला. तोपर्यंत तिच्या शेजारी असणारी व्यक्ती तेथून निघून गेली होती. त्यानंतर तातडीने तेथील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासण्यात आले असताना २ तरूण सहजपणे पर्समध्ये पैसे चोरताना दिसत आहेत. पोलिसांनी या दोन तरूणांचा तातडीने शोध घेत सायंकाळी त्यांना उशिरा ताब्यात घेतले. www.konkantoday.com