गणेशोत्सवात ७ रेल्वेस्थानकात प्रथमोपचार केंद्रे.

गणेशोत्सवात कोकण मार्गावर यंदा ३१० गणपती स्पेशलच्या फेर्‍या धावणार असल्याने चाकरमान्यांच्या सुरक्षित व आरामदारी प्रवासासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोकण मार्गावर ८ रेल्वे स्थानकांवर प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्‍यांसह २४ तास आरोग्य केंद्रे कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी रूग्णांवर निदानासाठी रत्नागिरी व चिपळूण स्थानकात रूग्णवाहिकाही उपलब्ध असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी दाखल होत असतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणपती स्पेशलच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मध्य, कोकण, पश्‍चिम व दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने ३१० गणपती स्पेशलच्या फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. उधना, विश्‍वामित्री, सुरत, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, पनवेल ते रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव, सुरतकल, ठोकूर व मंगळूर मार्गावर या फेर्‍या धावणार आहेत.राज्य आरोग्य प्राधिकरणाच्या समन्वयाने कोकण मार्गावर माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आदी आठ स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सुनिश्‍चितीसाठी आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button