
प्रभाग क्र. ५ मधील पाण्याच्या समस्या बाबत स्थानिक नागरिकांसह भाजपा पदाधिकारी नगरपरिषदेला दिली धडक.
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ नवलाई नगर परिसरातील दुर्वांकुर अपार्टमेंट येथील रहिवासी महिला यांनी तेथील पाण्याच्या समस्येबाबत भाजपा पदाधिकारी यांना माहिती दिली. गेले अनेक दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून. सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीला लागलेली गळती यामुळे प्रभाग क्रमांक ५ व ६ परिसरात याचा परिणाम होत असल्याचे देखील बोलले जात आहे.
नवलाईनगर दुर्वांकुर अपारमेंट मधील रहिवासी महिलांनी भाजपाच्या सायली बेर्डे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तेथील स्थानिक महिलांसह भाजपा पदाधिकारी सौ. सायली ताई बेर्डे, सौ. भक्ती दळी यांनी तेथील महिलांसह रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भेट दिली.
उपमुख्याधिकारी श्री चाळके साहेब यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी सौ. लीना हेमंत सुद्रिक, वेदा देवळेकर, सौ. विनोद किरण चुंबळकर, सौ.अर्चना मुकुंद मराठे, सौ. चारुशीला रवींद्र डोंगरे , सौ. जान्हवी नितीन जागुष्टे , सौ.स्नेहल सत्यविनायक मुळे, सौ.कोमल तेंडुलकर, सौ. सायली बेर्डे शहर महिला मोर्चा खजिनदार , सौ. भक्ती दळी महिला मोर्चा जिल्हा चिटणीस आदींनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गर्शनाखाली उपमुख्याधिकारी रत्नागिरी नगरपरिषद श्री चाळके साहेब यांना निवेदन देत नवलाई नगर प्रभाग क्रमांक ५ मधील दुर्वांकुर अपार्टमेंट मधील रहिवाशी यांच्या समस्या मांडल्या. लवकरच याबाबत उपाययोजना केली जाईल अशी आश्वासन यावेळी उपस्थितांना देण्यात आले.