
पूररेषा फेरसर्वेक्षणाला हिरवा कंदील
चिपळूण शहर व परिसरातील आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूररेषेमुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासात्मक कामे करताना नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाळ काढल्यामुळे नदीपात्राची पूर वाहन क्षमता आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झाल्याने चिपळूणसाठी जटील बनलेल्या या पूररेषेच्या फेरसर्व्हेक्षणाची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली असता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही हिरवा कंदील दाखवत जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.www.konkantoday.com




