मत्स्य विभागाची गस्ती नौका सुरळीत सुरू.
मच्छिमारीसाठी १५ ऑगस्टनंतर शासनाने परवानगी दिली असून मत्स्य व्यवसाय विभागाची परवानगी गस्ती नौका २२ ऑगस्टपासून कार्यरत झाली आहे. बेकायदेशीर मच्छिमारीवर नियंत्रण आणण्यासाठी गस्ती नौकांचा उपयोग सुरू झाला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, आधुनिक स्वरूपात गस्ती नौका रत्नागिरीत कार्यरत आहेत. २२ ऑगस्टपासून कामकाज सुरू झाले आहे. समुद्रात जाण्याविषयी अनुकुल शिफारस असेल त्याप्रमाणे गस्त घालण्यात येते. प्रतिकूल शिफारस असेल तर गस्ती नौका समुद्रात जात नाही. यावर्षीच्या हंगामात कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही.www.konkantoday.com