त्यांचा एक पेग 1500चा,- संजय राऊत
. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं. निवडणूक आल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता वाढवू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यावरुन खासदार राऊत म्हणाले की, राज्यातील यांचं सरकार 1500 च्यावर जाणार नाही. स्वःत 15 हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना 1500, कर्मचाऱ्यांना 1500 देतील. त्यांचं 1500 चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग 1500चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही 1500 पाठवतील, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच या सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. मग फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर खोटे गुन्हे दाखल केले. मग गृहखात्याला दोषी धरणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे.