सावकारी प्रकरणातील राधा लवेकर हिच्या शोधात पोलीस

सावकारी व ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल असलेल्या राधा लवेकर हिच्या घरी दोन दिवस पोलीस अटक करण्यासाठी गेले असता ती घरातून गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.बहाद्दूरशेख येथील एका महिलेने राधा लवेकरकडून २० हजारांचे कर्ज घेतले होते. ते पैसे परत केल्यावर त्या बदल्यात घेतलेले कागदपत्र परत मिळावे, यासाठी पीडित महिलेने मागणी केली असता तिला जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाला अटक करण्यासाठी शनिवारी व काल सोमवारी पोलीस पथक तिच्या खेंड चिपळूण येथील घरी गेले असता ती गायब असल्याने पोलिसांना सापडली नाही. दरम्यान, पोलीस तिचा शोध घेत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button