आता कोल्हापूर ते गोवा विमानसेवा देखील सुरु करण्यात येणार.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवेचा निर्णय झाला आहे. त्यानंतर आता कोल्हापूर ते गोवा विमानसेवा देखील सुरु करण्यात येणार आहे.19 आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी ही विशेष विमानसेवा असणार आहे. मार्गावरून सर्व अडथळे पार पडल्यास तासाभरात कोल्हापुरातून गोव्याला पोहोचणं शक्य होणार आहे.कोल्हापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे ती पूर्णत्वास जात आहे. गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर- हैदराबाद, हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू होईल. यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे आणखी एक विमान कंपनी कोल्हापूरशी जोडली जाणार आहे. कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरु झाल्यास कोल्हापूर ते गोवा हे अंतर अवघ्या एका तासात गाठता येणार आहे.सध्या कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर एक विमानसेवा सुरू आहे. दुसरीकडे, खासदार धनंजय महाडिक यांनी येत्या 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.