ऑनलाईन गिफ्ट खरेदी करण्यास सांगून अज्ञाताने महिलेची तब्बल १ लाखाची फसवणूक.

कंपनीचा बॉस असल्याचे भासवून स्टाफसाठी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी करण्यास सांगून अज्ञाताने महिलेची तब्बल १ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.याबावत श्वेता नथुराम साळसकर (रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी फिर्यादी या त्यांच्या घरी असताना अज्ञाताने त्यांच्या मेल आयडीवर व एक मेल पाठवून आपण त्यांच्या कंपनीचा बाँस जेसल मेहता असल्याचे भासवले. इतक्यावरच न थांबता नंतर फिर्यादीच्या व्हॉटसअॅप नंबरवर त्यांच्याशी चंटिंग करून विश्वास संपादन केला.दरम्यान, स्टाफसाठी सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी करण्यास सांगून क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डवरून फिर्यादीची एकूण २१ गिफ्टसाठी १ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button