मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षांमध्ये ४ कोटी ३७ लाख रत्नागिरी जिल्ह्यात वितरीत-रामहरी राऊत, पहा व्हिडिओ.
रत्नागिरी:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात ३०१ कोटी निधी वितरीत करण्यात आला. त्यापैकी ४ कोटी ३७ लाख रत्नागिरी जिल्ह्यात वितरीत झाला. यातील १ कोटी ३९ लाख एवढा निधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदरासंघातील २१८ लाभार्थ्यांना मंजूर करून दिला आहे. या योजनेची व्याप्ती वाढुन अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकाला ही मदत मिळावी, यासाठी आरोग्य वारी आपल्या दारी हा उपक्रम १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली. मंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे तसेच या योजनेचे रत्नागिरीचे काम पाहणारे महेश सामंत उपस्थित होते.