महामंडळाची नवीन जाहिरात: चालक पदासाठीच्या अटी.
संपाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक नवीन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहीरात कंत्राटी पद्धतीने चालक पदांसाठी आहे, ज्यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थांनाही सहभाग घेता येईल.चालक पदासाठीच्या प्रमुख अटींमध्ये, अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना आणि पी.एस.व्ही. बॅच असणे आवश्यक आहे. यासह, किमान १ वर्षाचा अवजड वाहन चालविण्याचा अनुभवही असावा. या अटींची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून ३ दिवसांच्या आत महाव्यवस्थापक (वाहतूक) म.रा.मा.प. महामंडळ, मुंबई यांच्याकडे आपली मागणी नोंदवणे आवश्यक आहे.