बजरंग पुनिया, विनेश फोगाटला काँग्रेसचे तिकीट मिळणार?; राहुल गांधींची घेतली भेट.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज बुधवारी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान बजरंग आणि विनेश यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याने दोघांना काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.विनेश फोगाटला दादरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. बजरंग पुनिया देखील निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच हरियाणा विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते आणि ४ ऑक्टोंबर रोजी दोन्ही राज्यांतील निकाल जाहीर होणार होता. मात्र, हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.