
फणसू गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल
दापोली : दापोली तालुक्यातील फणसू पंचक्रोशीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका प्रौढाने केला असल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. सदरची अल्पवयीन मुलगी आपल्या घराजवळील शौचालयात जात असता तिच्या शेजारी राहणार्या प्रौढाने तिच्याशी अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद दाखल झाली आहे.
www.konkantoday.com