नव्याने नूतनीकरण झालेल्या चिपळूण नाट्यगृहातील खुर्च्यां मोडू लागल्या.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील ८ खुर्च्यांची रविवारी एकाच दिवशी झालेल्या तीन कार्यक्रमादरम्यान मोडतोड झाली. मात्र या खुच्या तोडल्या की तुटल्या याबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासन तीनही आयोजकांची अनामत रक्कम जप्त करून त्यातून या खुर्च्यांची दुरूस्ती करणार आहे. हा खर्च वाढल्यास वाढीव रक्कमही वसूल केली जाणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून बर्याच कारणामुळे हे नाट्यगृह वादग्रस्त ठरले आहे. कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीच जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी झाल्या असून त्याचा अद्याप निकालही लागलेला नाही. त्यातच खुर्च्या बोगस असल्याचा आरोप करीत काही लोकप्रतिनिधींनी खुर्च्यांची शहरातून मिरवणूकही काढली होती. मात्र नाट्यगृह सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याचा विचार करता पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना जलदगतीने कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कामे पूर्ण झाल्यावर वर्षभरापूर्वीच या नाट्यग्हाचे लोकार्पण करण्यात आले. उदघाटनानंतर काही दिवसातच तीन खुर्च्या तुटल्या होत्या. तर सिलिंगचा काही भाग कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत.असे असताना रविवारी येथे एका समाजाचा मेळावा, सामाजिक संघटनेचा गीतांचा कार्यकमि व रात्री जाखडीनृत्य असे तीन कार्यक्रम झाले. त्यानंतर ८ खुर्च्यांची मोडतोड झाल्याचे सोमवारी लक्षात आले. www.konkantoday.com