
भाजपा तालुका अध्यक्ष निवड ,जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा निर्णय योग्य ,आमदार प्रसाद लाड यांचा निर्वाळा
रत्नागिरी तालुका भाजप अध्यक्षपदी सुशांत चवंडे यांची जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निवड केल्यानंतर बाळ माने समर्थक आक्रमक झाले होते. जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांना पक्षाने तसे अधिकार दिले असून त्यांनी निवड केलेल्या तालुका अध्यक्षांची निवड अधिकृत असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. आहे .तालुका पदाधिकारी नेमण्याचा निर्णय जिल्हा अध्यक्षांचा असतो तसे अधिकार पक्षाने दिलेले असतात .या प्रश्नावरून जुने नवे असा वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जुन्या पदाधिकार्यांचा योग्य तो मानसन्मान ठेवला जाईल.मात्र त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असेही लाड यांनी स्पष्ट केले.यामुळे आमदार लाड यांनी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या बाजूने आपला कौल स्पष्ट केल्याने हा बाळ माने गटाला एकप्रकारे धक्का असल्याचे समजले जाते .
www.konkantoday.com




