ऑडी कार कंपनीचे प्रमुख १० हजार फुटांवरून कोसळले, जागीच मृत्यू.
इटलीतील लक्झरी कार ब्रँड ऑडीचे प्रमुख फॅब्रिझियो लाँगो (वय ६२) हे १० हजार फूट उंच डोंगरावरून दरीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. इटली-स्वित्झर्लंड सीमेजवळील डमेलो पर्वताच्या शिखरावर चढाईदरम्यान ही दुर्घटना घडली*शिखरावर पोहोचण्यापूर्वी काही अंतरावर त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत पडले. एका मित्राने बचाव पथकाला माहिती दिली. हेलिकॉप्टरमधून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. त्यांचा मृतदेह ७०० फूट खाली पडलेला आढळला. सुरक्षिततेच्या उपायांचा काटेकोर अवलंब केल्यानंतरही हा अपघात कसा झाला, त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.