एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या एसटीच्या नियोजनावर परिणाम होणार
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आंदोलन पुकारले आहे. ठाणे एसटी आगार क्रमांक एक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.२) आंदोलनदेखील केले, तर अनेक ठिकाणी संप पुकारला आहे. त्याचा परिणाम कोकणात जाणाऱ्या एसटीच्या नियोजनावर होणार असल्यचे दिसून येत आहे. ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या एसटी या इतर आगारातून मागविण्यात येत असतात, मात्र कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी आल्या नाहीत, तर कोकणात गणेशभक्तांना घेऊन जायचे कसे, असा पेच ठाणे एसटी नियंत्रक विभागापुढे उभा ठाकला आहे.