
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नुकत्याच दोन नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. निरुपद्रवी प्रकारातील ही बुरशी असून साधारणपणे जंगलामधील झाडांच्या पानांवरती ही बुरशी आढळून येते. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतिक दिलिप नाटेकर, कै.कु. दुर्गा बमनेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथील प्रा.डॉ. महेंद्र भिसे व श्रीमान निरंजन जगद्गुरू पंचम श्री निजलिंगेश्वर महास्वामी ट्रस्टचे विज्ञान आणि वाणिज्य पदवी महाविद्यालय निडसोशी हुक्केरी तालुका बेळगाव येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सिदानंद कंभार यांच्या टिमने दोन वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर या दोन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लावला आहे.रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात वनस्पतींवर अभ्यास करताना डॉ. नाटेकर आणि त्यांच्या सहकार्यांना या विशिष्ठ प्रकारच्या बुरशी नजरेस पडल्या. त्यांनी त्या बुरशींचे नमूने गोळा करून पूणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट येथे पुढील तपासणीसाठी पाठवले. बुरशींच्या नमुन्यावर सुमारे दोन वर्षे सखोल अभ्यास करून त्या नवीन बुरशींचे नामकरण करण्यात आले.www.konkantoday.com




