रत्नागिरी जिल्हा परिषदला तब्बल 185 नवे ग्रामसेवक मिळणार.
रत्नागिरी जिल्हा परिषदला तब्बल 185 नवे ग्रामसेवक मिळणार आहेत. ग्रामसेवक भरती अंतिम टप्प्यात असून सध्या या कागदपडताळणी प्रक्रियेला जि.प. भवनात सुरुवात झाली आहे. एकूण 336 जणांची कागदपडताळणी दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर 15 दिवसांत या ग्रामसेवकांना नियुक्त पत्र देण्यात येणार आहे.अनेक वर्ष रखडलेली ग्रामसेवक भरती अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी ग्रामसेवक भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यात 185 जागांसाठी तब्बल 41 हजार अर्ज दाखल झाले होते. या भरतीलासुद्धा ग्रहण लागले होते. मार्च महिन्यात होणारी परीक्षा ऑगस्ट महिन्यात झाली होती. अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु आता ही भरती अंतिम टप्प्यात आली आहे.जि.प.ने 185 जागांसाठी 336 जणांना कागद पडताळणीसाठी बोलावले आहे.