संगमेश्वर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे प्रकरणी अजून एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस

दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी पकडले होते. यानंतर हा वाद वाढल्याने अखेर पोलिस स्थानक गाठावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्याला अटक केली आहे. सध्या या शिक्षकाची चौकशी सुरु आहे. सध्या या प्रकरणामुळे तालुक्यातील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. संबंधित शिक्षक संजय मुळ्ये याच्यावर जि. प. ने लगेच कारवाई करत त्याचे निलंबन केले आहे.या शिक्षकाचे निलंबन करतानाच संबंधित मुख्याधिपिकेला सुद्धा या गोष्टीला जबाबदार धरण्यात आले असून चौकशी अहवालात या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार माहिती होती. असे असतानासुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत तिलासुद्धा निलंबित केले आहे. त्याचबरोबर अजून एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, झालेल्या प्रकाराचा जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रत्येक शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिल्या आहेत. याबाबत दोन दिवसांत केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button