मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल.
* मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणेंनी केलं होतं.यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान नितेश राणेंना भोवण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदू समाजातील अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी नितेश राणेंनी ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे