
मिऱ्या एमआयडीसीला संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीचा ठाम विरोध.
मिऱ्या एमआयडीसीला संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखाने ठाम विरोध केला आहे. या जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय इथे काहीही उभं करण्यास आम्ही देणार नाही असा निर्धार व्यक्त करताना एकजुटीने उभा राहण्याचा निश्चय मिर्यावासियानी केला आहेरत्नगिरी शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खाजगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र अर्थात बंदर एमआयडीसी म्हणून जाहिर करण्यात आले आहे.अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी मिऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थांना याची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडालीसंदर्भात सडामिऱ्या आणि जाकीमिऱ्या येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये या प्रकल्पाविरोधात ठराव करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी मिर्या येथील अलावा येथे संपूर्ण मिऱ्या वासीयांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. त्याला मिऱ्याचे भूमिपुत्र म्हणून माजी आमदार बाळ माने, दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, महिला सुद्धा ग्रामस्थ म्हणून उपस्थित होते.लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचे जे स्वप्न दाखवले जाणार आहे ते आम्हाला नको आहे, समोरील मिरकरवाडा या भागाचाही विकास या प्रकारे होऊ शकतो मात्र मिऱ्या मध्ये अशा प्रकारे कोणताही प्रकल्प किंवा एमआयडीसी उभारू दिली जाणार नाही, असा एकमुखी निर्धार भर पावसात ग्रामस्थांनी केला.