माजी सभापती जया माने यांच्याकडून पद्मा कन्या शाळा कोंडगावला सीसीटीव्ही  संच कार्यान्वित.

आमदार राजन साळवी व कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी यांच्याकडून लोकार्पण अदयावत सीसीटीव्ही असणारी तालुक्यातील ठरली पहिली शाळा मागील काही दिवसापासून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये शालेय मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे शासनाकडून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवावा, अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले. त्यामुळे पद्मा कन्या शाळा ही कोंडगाव बाजारपेठ मधील सुमारे 200 आसपास पटसंख्या असणारी मुलींची शाळा आहे. ही शाळा मुख्य बाजारपेठ मध्येच येते. त्यामुळे माजी सभापती जया माने यांनी ही गरज ओळखून स्वखर्चाने या शाळेला अद्यावत सीसीटीव्ही संच बसवून दिला. हा लोकार्पण सोहळा आमदार राजन साळवी, कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांच्या उपस्थित पार पडला.यावेळी त्यांच्या समवेत अजय सावंत, शेखर आकटे,प्रवीण जोयशी, मंदार आठल्ये,पालक संघांचे सुनील शिंदे,केंद्रप्रमुख दिव्या भाटकर,मुख्यध्यापिका चारुता खानविलकर ,ग्रा. प सदस्या हर्षा आठल्ये,शिक्षिका नीलम शेडे,ऍड. उज्ज्वला चव्हाण,विद्या कदम, संयमी बांडांगळे,सौ. आरोही वाघधरे,सुनील चवरे,रोहन पाटील,सतीश कांबळे, युवासेनेचे पदाधिकारी सागर तांदळे, अजिंक्य किर, सागर मांडवकर आदी कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शाळेतील पालकांनी आमदार राजन साळवी, माजी सभापती जया माने यांचे आभार मानले.त्याचबरोबर आमदार राजन साळवी, जया माने यांनी शाळेतील निरनिराळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button