
बसस्थानक दुरवस्थेप्रश्नी कॉंग्रेसने दंड थोपटले
. खेड बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. एसटी प्रशासनाने आजवर बसस्थानकाच्या डागडुजीकडे कानाडोळा केला आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. या प्रश्नी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एस.टी. प्रशासनाला जाब विचारला. ५ सप्टेंबरपर्यंत बसस्थानक सुस्थितीत आणून प्रवाशांची योग्य ती सोय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.येथील बसस्थानकात प्रवाशांची मोठी कर्दी असते. गणेशोत्सव अवघ्या ६ दिवसांवर येवून ठेपला आहे. यामुळे बसस्थानक चाकरमान्यांच्या रेलचेलीने गजबजणार आहे. मात्र बसस्थानकाची अवस्था बिकट आहे. बर्याचवेळा प्रवाशांना स्थानकात बसण्यासाठी जागाही मिळत नाही. ठिकठिकाणी गळती लागली असून पत्र्याची शेडही फुटली आहे. यामुळे पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. www.konkantoday.com