जमिनी विकण्यापेक्षा कोकणवासियांनो त्यावर व्यवसाय उभारा
. कोकण विकासापासून वंचित राहता कामा नये, शिवाय इथल्या जमिनी कोणाच्या तरी ताब्यात जाता कामा नये, कोकणातील जमिनीवर विकण्यापक्षा त्या जमिनीवर व्यवसाय उभारा. कोकणातील जमिनीमध्ये उपयुक्त शेती होवू शकते, याचा अभ्यास करून त्या जमिनी शेती लागवडीखाली आणा. त्या पिकाचे मार्केट तयार करण्यासाठी तसा प्रयत्न झाला पाहिजे असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघ, रत्नागिरी शाखा यांच्यावतीने मराठा शक्ती संस्कृती जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की राज्यात इतकी सारी महामंडळं असताना त्या तुलनेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ सर्वात जास्त करत आहे. www.konkantoday.com