
चिपळूण शहरातील काही बांधकाम व्यावसायिकाची मनमानी, इमारतींसाठी लागणारे साहित्य रस्त्यांवर.
चिपळूण शहरातील काही बांधकाम व्यावसायिक मनमानी करताना दिसत असून ते त्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य थेट रस्त्यावर ठेवत आहेत. खेंड भागात कायम असा प्रकार दिसून येत असून यामुळे वाहतुककोंडी होत आहे, असे असताना नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.२०२१ साली आलेल्या महापुरानंतर लागू करण्यात आलेल्या निळ्या आणि लाल पूररेषेमुळे येथील बहुतांशी बांधकामे थांबली असली तरी जुनी परवानगी आहे, असे सांगून नगर परिषदेच्या आशीर्वादाने आजही निळ्या व लाल पूररेषेत अनेक बांधकामे सुरु असल्याचे दिसून येत आहे. ही कामे सुरू कशी, हा संशोधनाचा भाग असला तरी अशी बांधकामे करणार्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत.www.konkantoday.com