गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता.

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पााच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लगबग सुरु आहे. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे.यासाठी दरवर्षी मुंबईसह अन्य शहरांमधील हजारो चाकरमनी गणपती उत्सवाच्या काळात कोकणातील आपापल्या गावी जातात. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून आज पासून संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button