
खेड खाडीपट्ट्यात विनापरवाना वाळू उत्खनन.
खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यात विनापरवाना चोरटी वाळू उत्खनन सुरू असल्याची बाब समोर आली आहे. वाळू उत्खननासाठी तीन सक्शन पंपांचा वापर करण्यात येत आहे. या वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू आहे. ही बाब महसूलच्या निदर्शनास येत नसल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या वाळू उत्खननात नेमका वरदहस्त कुणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था होत आहे.www.konkantoday.com