
RDCC बँकेची केवळ घरडा केंद्रावरील परीक्षा रद्द उर्वरित केंद्रांवर वेळापत्रकानुसार होणार परीक्षा
. रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर दि. ०१/०९/२०२४ ते ०४/०९/२०२४ या कालावधीत तीन सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. परंतु या चार परीक्षा केंद्रापैकी फक्त घरडा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मु. पो. लवेल, ता. खेड या परीक्षा केंद्रावर नेटवर्क संदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे दि.०१/०९/२०२४ व दि. ०२/०९/२०२४ या दोन दिवसामध्ये होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात आली असून घरडा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मु.पो. लवेल, ता. खेड या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा रद्द झाल्याबाबत ई-मेलद्वारे कळविणेत आले आहे. तसेच पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रद्द झालेली ही परीक्षा नंतर घेण्यात येणार असून त्यासंबंधीची माहिती संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपूर्वी तीन ते चार दिवस आगाऊ मेसेज द्वारे, ई-मेलद्वारे तसेच वेबसाईटद्वारे परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून कळविण्यात येणार आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घेऊन बँकेस सहकार्य करावे. तसेच उर्वरीत इतर तीन केंद्रावरील परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत याचीही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.