वैद्यकिय अधिकाऱ्याशी तसेच शासकीय इमारतीमध्ये आरडा-ओरडा करुन असभ्य वर्तन करणाऱ्या मद्यपी वॉर्डबॉय विरुद्ध गुन्हा दाखल.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्याशी तसेच शासकीय इमारतीमध्ये आरडा-ओरडा करुन असभ्य वर्तन करणाऱ्या मद्यपी वॉर्डबॉय विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मिलींद मधुकर चव्हाण (वय ५३, रा. मुरुगवाडा, जुन्हा भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) असे संशयित कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेडिकल मेल सर्जिकल वॉर्डमध्ये घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मिलींद चव्हाण हा मद्य प्राशन करुन ड्युटीवर आला होता म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ. विनोद सांगविकर यांनी त्याला दारु पिवून का आला अशी विचारणी केली असता त्याने मद्याच्या नशेत शासकीय इमारतीच्या कार्यालयीन ठिकाणी आरडा-ओरडा करुन असभ्य वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वॉर्डबॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.