विधिमंडळातील उत्कृष्ट संसदपटू आणि भाषणासाठीचे पुरस्कार जाहीर; पाहा कोणत्या आमदारांनी पटकावले पुरस्कार

विधानसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. मात्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सहा वर्षातील कामकाजा दरम्यान उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीचे पुरस्कार हे एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत. कोणाला नेमके कोणते पुरस्कार मिळालेत वाचा सविस्तर.

विधानसभा 2018-19*उत्कृष्ट संसदपटू – बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप)उत्कृष्ट भाषण – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप)

विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू – डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप)उत्कृष्ट भाषण – हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)

विधानसभा 2019-20*उत्कृष्ट संसदपटू – प्रकाश आबिटकर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप)उत्कृष्ट भाषण – सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)

विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस)उत्कृष्ट भाषण – रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)

विधानसभा 2020-21 उत्कृष्ट संसदपटू – अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष)उत्कृष्ट भाषण – प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू – प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे (शिवसंग्राम)उत्कृष्ट भाषण – मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप)

विधानसभा 2021- 22*उत्कृष्ट संसदपटू- संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप)उत्कृष्ट भाषण – सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप)*विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप)उत्कृष्ट भाषण – गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी)

विधानसभा 2022- 23*उत्कृष्ट संसदपटू- भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप)उत्कृष्ट भाषण – यामिनी जाधव (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप)

विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू – प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)उत्कृष्ट भाषण – बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रज्ञा सातव (काँग्रेस)

विधानसभा 2023- 24*उत्कृष्ट संसदपटू – रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप)उत्कृष्ट भाषण – कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)

विधान परिषद :*उत्कृष्ट संसदपटू- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप)उत्कृष्ट भाषण – आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप)सहा वर्षांचे हे सगळे पुरस्कार एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत आता या पुरस्कार सोहळ्याकडे पुरस्कार्थी आमदारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button