
राणे आणि ठाकरे यांच्यात का होतात राडे याचे मला पडलेय कोडे’- रामदास आठवले यांची मिश्किल प्रतिक्रिया.
राणे आणि ठाकरे यांच्यात का होतात राडे याचे मला पडलेय कोडे’ राजकोट येथील राड्यावर रामदास आठवले यांची मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. राणे आणि ठाकरे गटातील राडा हा पहिला राडा नाही खरं तर हा राडा इथे व्हायला नको होता.पोलिसांनी दोन्ही गटाला वेगवेगळ सोडणं गरजेचं होत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते सातत्याने सरकार आणि शिंदेंवर आरोप करत आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप आपण कधी ऐकले नाहीत पूर्वीचं राजकारण नितिमत्तेवर आधारित होतं. विरोधकांना सत्ता न मिळाल्याने ते तडफडत आहेत असं रामदास आठवले म्हणालेत.