रत्नागिरी शहराजवळील शिरगाव- नाखवामोहल्ला येथे झालेल्या मारहाणीतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

. रत्नागिरी शहराजवळील शिरगाव- नाखवामोहल्ला येथे झालेल्या मारहाणीतील सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीन एजाज नाखवा, एजाज नाखवा, इम्रान नाखवा, खैरुन नाखवा, आतिफा इम्रान नाखवा, आफ्रीन एजाज नाखवा, अरसलान एजाज नाखवा सर्व राहणार ( शिरगाव-नाखवा मोहल्ला, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ३१ ऑगस्टला दुपारी दीडच्या सुमारास घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यापैकी संशयित इमरान व अरसलान यांनी लाकडी काठीने फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच शिरीन नाखवा हिने फिर्यादीच्या नाकाला चावा घेऊन दुखापत केली. सर्वांनी मिळून महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button