महाराष्ट्रासह 20 राज्यांना पाऊस झोडपणार; 99 रेल्वे रद्द, मुंबईतून ‘ही’ एक्सप्रेस धावणार नाही, ट्रॅकही गेला वाहून!
: हवामान विभागाने (IMD) आज 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील मणिपूर, आसाम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.* यापूर्वी, गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये विध्वंस केला आहे. तेलंगणात नऊ जणांचा मृत्यू झाला. समुद्रम ते महबूबाबाद दरम्यानचा रेल्वे ट्रॅक वाहून गेला. त्यामुळे दिल्ली-विजयवाडा मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 99 गाड्या रद्द केल्या असून 54 गाड्या वळवल्या आहेत.*99 गाड्या रद्द*दक्षिण मध्य रेल्वेने रविवारी एकूण 99 गाड्या रद्द केल्या आणि 54 गाड्या वळवल्या आहेत. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत त्यामध्ये दानापूर-बेंगलोर, निजामुद्दीन-कन्याकुमारी, सीएसटी मुंबई-भुवनेश्वर आणि तांबरम-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. तेलंगणामध्ये सोमवारी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.